मराठी विज्ञान परिषद पत्रिका

मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या मुखपत्राद्वारे १९६७ सालापासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ या नावाने जानेवारी १९६७ ते मार्च १९६८ या काळात सुरु असलेले हे मासिक एप्रिल १९६८ पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. सध्या वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे ११ मासिक अंक आणि सुमारे १५० ते १७५ पानांचा दिवाळी अंक असे १२ अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो. पत्रिकेच्या वर्गणीचा तपशील सभासदत्वाच्या पानावर पाहावा.

ई-पत्रिका

 • सोबत परिषदेच्या बँक खात्याची माहिती दिली आहे. त्याचा उपयोग करून ही वर्गणी, इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने परिषदेच्या खात्यात आपण भरू शकता. त्याचा संबंधीत व्यवहारसंकेतांक कृपया टिपून ठेवावा.
 • सोबत परिषदेच्या खात्याचा क्यूआरकोड (QRCode) दिला आहे. त्याचे स्कॅनिंग करून ही वर्गणी, यूपीआय (UPI)च्या साहाय्याने परिषदेच्या खात्यात आपण भरू शकता; यूपीआय व्यवहारसंकेतांक कृपया टिपून ठेवावा.
 • सर्वप्रथम ई-पत्रिकेची रु. १०००/- वर्गणी भरावी आणि व्यवहार संकेतांक टिपून ठेवावा,
 • त्यानंतर खाली दर्शविलेल्या ई-पत्रिका नोंदणी अर्ज या बटणावर टिचकी मारून, उघडणारा अर्ज भरावा,
 • अर्जातील सर्व माहिती सविस्तर आणि काटेकोरपणे भरावी,
 • टिपून ठेवलेला व्यवहार संकेतांक सदर अर्जात शेवटी लिहावा, याशिवाय आपल्या अर्जाची नोंदणी पूर्ण होणार नाही.
 • अर्ज आणि भरलेल्या रकमेची निश्चिती झाल्यावर पावती आपल्याकडे ई-मेलद्वारे पाठविली जाईल.

पत्रिका (छापील)

वार्षिक वर्गणी रु. ३५०/-, त्रैवार्षिक वर्गणी रु. १००१/-

 • सर्वप्रथम वर नमूद केलेल्या दोन पर्यायापैकी, तुम्हाला सोईस्कर असलेला पर्याय वापरून मराठी विज्ञान परिषदेच्या खात्यात पत्रिकेची रु. ३५०/- (वार्षिक) किंवा रु. १००१/- (त्रैवार्षिक) वर्गणी भरावी आणि व्यवहार संकेतांक टिपून ठेवावा,
 • त्यानंतर खाली दर्शविलेल्या छापील-पत्रिका नोंदणी अर्ज या बटणावर टिचकी मारून, उघडणारा अर्ज भरावा,
 • टिपून ठेवलेला व्यवहार संकेतांक सदर अर्जात विचारलेल्या ठिकाणी लिहावा, याशिवाय आपल्या अर्जाची नोंदणी पूर्ण होणार नाही,
 • अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी.
 • अर्ज आणि भरलेल्या रकमेची निश्चिती झाल्यावर पावती आपल्याकडे पाठविली जाईल.
QR Code Image