सभासदत्व

परिषदेचे आजीव सभासदत्व घेतल्यास आपलाही परिषदेच्या या विज्ञान प्रसाराच्या कार्यास हातभार लागणार आहे. तेव्हा आपण परिषदेचे आजीव सभासद व्हावे, ही विनंती. त्यासाठी खाली दिलेला अर्ज भरून परिषदेकडे पाठवावा.

प्रा. ज्येष्ठराज जोशी

अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

उद्देश

 • विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
 • विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
 • विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
 • वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे.

तुम्ही काय करू शकता?

 • मराठी विज्ञान परिषद (मविप) समाजात विज्ञानाच्या प्रसारामध्ये

सभासदांचे अधिकार

मराठी विज्ञान परिषदेची वाटचाल

मराठीतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून, दि. २४ एप्रिल, १९६६ रोजी स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेने, एप्रिल २०१६मध्ये पन्नास वर्षे पूर्ण करून एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केले. विविध विषयांवरची व्याख्याने, चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रमांनी कार्याला सुरुवात झाल्यानंतर, परिषदेतील कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. ‘विज्ञान मित्र’ पासून ‘संकल्पना विकसन” अभ्यासक्रमापर्यंतचे अनेक उपक्रम परिषदेतर्फे घेतले जाऊ लागले. विज्ञान खेळणी शिबिरातून विद्यार्थ्यांना “हसत-खेळत शिक्षण’ देण्यासही परिषदेतर्फे सुरुवात झाली.

बालविज्ञान संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून छोटे प्रकल्प करून घेतले जाऊ लागले. याबरोबरच, विद्यार्थ्यासाठी विविध विषयांवरील शिबिरे, तसेच भविष्यात त्यांनी संशोधनाकडे वळावे म्हणून त्यांच्यासाठी व्याख्याने घेतली जाऊ लागली. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिताही कार्यक्रम सुरू झाले. या सर्व विद्यार्थ्याच्या कार्यक्रमांबरोबरच शिक्षकांसाठीही व्याख्याने, प्रात्यक्षिकांसह कृतिसत्रे, संशोधन संस्थांना भेटी असे नाना प्रकारचे कार्यक्रम परिषद घेते आहे.

“मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या मासिकाचा विज्ञान प्रसारात मोठा वाटा आहे. वैज्ञानिक जगतात घडणाऱ्या घडामोडींची सोप्या भाषेत ओळख करून देण्याच्या उद्देशाने चालवल्या जाणाऱ्या या लोकप्रिय मासिकाने ५ ० ० अंकांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे.
विज्ञान प्रसारात उल्लेखनीय योगदान, कृषितंत्रज्ञानात नावीन्यपूर्ण काम, लघुउद्योजकांनी केलेले नावीन्यपूर्ण संशोधन, विज्ञान संशोधनासाठी प्राध्यापकांकरिता म. म. शर्मा पुरस्कार, विद्यार्थ्यांकरिता विज्ञान संशोधन पुरस्कार, वार्षिक निबंध स्पर्धा, कथा स्पर्धा, विज्ञानविषयक पुस्तकांकरिता पारितोषिके, इत्यादी पुरस्कारांच्या मार्गाने विज्ञानप्रसार करण्याचे कामही परिषद करत आहे. लैंगिक शिक्षण, तसेच ‘वीज वाचवा, पाणी वाचवा’ यांसारख्या विषयांवरील विशेष कार्यक्रम, सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी शिबिर, विघटनशील कचऱ्याचा थेट विनियोग करून ‘शहरी शेती’च्या माध्यमातून भाज्या व फळांचे उत्पादन घेण्यासंबंधीचे प्रशिक्षण अशी कितीतरी उपयुक्‍त कामे परिषद निरंतर करत आली आहे. परिषदेचा वर्धापन दिन व  वार्षिक अधिवेशनही उत्साहाने साजरे केले जाते. परिषदेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.