सर्वांसाठी असणारे उपक्रम

विज्ञान अधिवेशन

१९६६ सालापासून परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून परिषदेतर्फे निवडले जातात. अधिवेशनाच्या अध्यक्षांचे भाषण हे या अधिवेशनांचे वैशिष्ठ्य मानले गेले आहे. वेगवेगळ्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येतो. व्यासपीठावरील दोन दिवसांच्या कार्यक्रमांत परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप, आदींचा समावेश असतो. अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. अधिवेशन हे परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी आयोजित केले जाते.

वर्धापन दिन

परिषदेची स्थापना २४ एप्रिल १९६६ रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनांत परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते.

सौरऊर्जा वर्ग

स्वरूपः सूर्यचूल तयार करण्याचे प्रशिक्षण

अवधीः दोन दिवस (रोज ६ तास)

शहरी शेती

स्वरूपः घरात निर्माण होणारा जैविक कचरा वापरून गच्ची किंवा सज्ज्यासारख्या छोट्या जागेत करता येणारी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड

अवधीः एक दिवस (३.५ तास) - दर महिन्याच्या पहिल्या रविवारी

व्याख्याने/व्याख्यानमाला

परिषदेतर्फे विविध विषयांवर व्याख्याने/व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. सुर्यग्रहणासारख्या विशिष्ट घटनांशी निगडीत वा विशिष्ट माहिती सर्वत्र पोचवण्याच्या दृष्टीने ही व्याख्याने/व्याख्यानमाला विविध विभागांत आयोजित करण्यात येतात.

राष्ट्रीय विज्ञान दिन

दिनांक २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मुरली चुगानी संदर्भालय

पूर्णपणे संगणकीकृत आणि फोटो कॉपिंगची सुविधा असलेले संदर्भालय परिषदेत आहे. या संदर्भालयात मराठी व इंग्रजी भाषेतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सुमारे ४,५०० पुस्तके उपलब्ध आहेत. यांत भारतीय सरिता कोश, कृषिज्ञान कोश व विश्वकोश यासारखे संदर्भ कोशांचाही समावेश आहे. संदर्भालयातील सुमारे साडेतीनशे पुस्तके ही दुर्मिळ स्वरूपाची आहेत. हे संदर्भालय मंगळवार ही परिषदेची साप्ताहिक सुटी वगळता रोज ११ ते ५ या वेळात उघडे असते. परिषदेच्या सभासदांना याचा लाभ मिळतो.

डॉ. रामभाऊ म्हसकर सी.डी. संग्रहालय

परिषदेने सी.डी. संग्रहालय असून त्यात विविध वैज्ञानिक विषयांवरील सुमारे ३०० सी.डी. उपलब्ध आहेत. या सी.डी. शुल्क भरून घरी नेता येतात. यातील बहुतांश सी.डी. या इंग्रजी भाषेतील असल्या तरी काही सी.डी. मराठी भाषेतही आहेत.

प्रदर्शने

परिषदेच्या संदर्भालयात विविध विषयांवरची विविध प्रदर्शने उपलब्ध असून ती शाळांना व संस्थांना सशुल्क दिली जातात.

एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम)

स्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)
स्तरः मुली (सहावी) – वयोगटानुसार १२ वर्षांवरील मुली आणि महिलांसाठी; मुलगे (नववी) – वयोगटानुसार १४ वर्षांवरील मुलगे आणि पुरूषांसाठी

अवधीः सुमारे दीड तास

विज्ञान परिक्षा

स्वरूपः पुस्तिका आणि प्रश्नपत्रिका टपालाद्वारे (उत्तरपत्रिका व इतर प्रकल्प अहवालाची टपालाद्वारे स्वीकार)
स्तरः सातवी ते नववी (माध्यम – मराठी आणि इंग्रजी)
नोंदणीः ऑगस्ट अखेरपर्यंत

अवधीः उत्तरपत्रिका डिसेंबर अखेरीपर्यंत अपेक्षित

बालोद्यान वर्ग

स्तरः इ. पहिली ते तिसरी
स्वरूपः विविध प्रकारचे खेळ आणि प्रयोग

अवधीः दोन किंवा तीन दिवस (एकूण ६ तास)

विज्ञान प्रयोग मेळावा

स्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं
स्तरः इ. सहावी ते नववी

अवधीः एक दिवस (एकूण ३ ते ३.५ तास)

निरंतर विज्ञान कक्ष

स्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं, चर्चा
स्तरः इ. सहावी ते नववी

अवधीः एक दिवस (एकूण ३ तास)

विज्ञान खेळणी

स्वरूपः वैज्ञानिक खेळणी तयार करणे
स्तरः (१) इ. तिसरी ते पांचवी आणि (२) इ. सहावी ते दहावी

अवधीः (१) एक दिवस (६ तास) आणि (२) दोन दिवस (एकूण १२ तास)

विज्ञान सफर

स्वरूपः वैज्ञानिक चर्चा, खेळ, प्रयोग, इ.
स्तरः सहावी ते दहावी

अवधीः एक दिवस (एकूण ४ तास)

प्रयोग कार्यशाळा

स्वरूपः विज्ञान विषयांतील विविध प्रात्यक्षिके आणि चर्चा
स्तरः (१) पांचवी ते सांतवी आणि (२) आठवी ते नववी

अवधीः एक दिवस (एकूण ७ तास)

दहावी प्रयोग सराव वर्ग

स्वरूपः प्रयोग प्रात्यक्षिक, शंका-निरसन
स्तरः दहावी

अवधीः एक दिवस (सुमारे ७ तास)

विज्ञान मित्र

स्वरूपः विविध वैज्ञानिक तत्त्व, संकल्पनांची ओळख.

अवधीः ७ दिवस (रोज ५ तास)

संकल्पना विकसन अभ्यासक्रम

स्वरूपः शालेय अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख
स्तरः पाचवी ते आठवी (प्रत्येक इयत्तेचा वेगळा गट)

अवधीः वर्षभर (शनिवार - रविवार, अर्धवेळ)

वयांत येताना (दृकश्राव्य कार्यक्रम)

स्वरूपः स्वतःच्या शरीराची ओळख, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)
स्तरः मुलींसाठी (नववी) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे)

अवधीः सुमारे दीड तास

एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम)

स्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)
स्तरः मुलींसाठी (सहावीच्या पुढे) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे)

अवधीः सुमारे दीड तास

विज्ञान मंडळ (पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून परिसराचा अभ्यास)

स्वरूपः शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान कोडी, प्रात्यक्षिकं, (१ कि.मी. परिसराच्या फेरफटक्याचा समावेश)
स्तरः सातवी ते नववी

अवधीः वर्षभर (ठरावीक दिवशी)

बालविज्ञान संमेलन

१९९५ सालापासून विद्यार्थ्यांसाठी परिषदेतर्फे बालविज्ञान संमेलन आयोजित केले जाते. हे संमेलन दर तीन वर्षांतून एकदा राज्यपातळीवर तर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी तालुकापातळीवर घेतले जाते. यांत विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण आणि वेगवेगळ्या कृतीसत्रांचा समावेश असतो. या संमेलनांबरोबरच शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाते.