वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)चे स्वरुप
- प्रथमा परीक्षा– लहान गटासाठी – इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि
द्वितीया परीक्षा– मोठ्या गटासाठी – इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षासुद्धा देऊ शकतात; त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. - एकूण ८ आठवड्यांच्या कालावधीत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना – दोन आठवड्यांचा एक टप्पा याप्रमाणे – चार टप्प्यात अभ्यास-सामग्र
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)चा अभ्यासक्रम व व्याप्ती
प्रथमा (इयत्ता ६ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी)
भौतिकशास्त्र
गती, बल व यंत्रे; ऊर्जा; ध्वनी; उष्णता; विद्युत; चुंबक; प्रकाश.
रसायनशास्त्र
मूलद्रव्ये, मिश्रणे व संयुगे, धातू आणि अधातू, रासायनिक व भौतिक बदल; आम्ल व आम्लारी; नैसर्गिक साधनसंपत्ती : हवा, पाणी व जमीन
वनस्पतीशास्त्र
वनस्पतींमधील विविधता व अनुकूलन; वनस्पतींचे विविध भाग आणि त्यांची कार्ये; वनस्पतींमधील वाढ, हालचाल व प्रतिसाद; वनस्पतींमधील पोषण
प्राणीशास्त्र
प्राणीसृष्टीतील विविधता व अनुकूलन; सूक्ष्मजीव, प्राण्यांमधील वाढ, हालचाल व प्रतिसाद; आहार आणि पोषण.
खगोलविज्ञान
आपली सूर्यमाला; तारकासमूह; उल्का, अशनी आणि धुमकेतू
द्वितीया (इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी)
भौतिकशास्त्र
गती व बल; कार्य व ऊर्जा; विद्युतधारा व विद्युतधारेचे परिणाम; ध्वनी; प्रकाश;
रसायनशास्त्र
अणू संरचना; रासायनिक अभिक्रिया; कार्बन आणि कार्बनी संयुगे; हरित रसायनशास्त्र
वनस्पतीशास्त्र
वनस्पतींमधील वेगवेगळ्या जीवनप्रक्रिया; वनस्पतीशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान
प्राणीशास्त्र
मानवी पचनसंस्था, चेतासंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, उत्सर्जनसंस्था
खगोलविज्ञान
तारे आणि त्यांचा जीवनक्रम, अवकाशाचा वेध, अवकाशसफरी
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)साठी पारितोषिके
प्रथमा ६वी-७वी आणि द्वितिया ८वी- ९वी
- १ले दुर्बीण
- २रे द्विनेत्री
- ३रे सूक्ष्मदर्शक
- ४थे प्रयोगसंच
- ५वे प्रयोगसंच
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)चे वेळापत्रक
२६ ऑगस्ट, २०२० ते ६ डिसेंबर, २०२० (१०३ दिवस)
अनु. क्र. | कृती | दिनांक | तपशील | |
पासून | पर्यंत | |||
१. | प्रवेश नोंदणी प्रक्रिया- | २६ ऑगस्ट | २७ सप्टेंबर | नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणे आणि त्याबरोबर २००/- फी भरणे. |
२. | अभ्यासक्रम सामग्री पाठविणे- | २० सप्टेंबर | १८ नोव्हेंबर | पीडीएफ् स्वरुपातील सामग्री, व्हीडीओ व्याख्याने-प्रयोग, विज्ञान कोडी, विज्ञान-खेळ |
प्रथम टप्पा- | २० सप्टेंबर | २० सप्टेंबर | प्रत्येक टप्प्याच्या शेवटी १० गुणांची एक छोटी चाचणी परीक्षा | |
प्रथम चाचणी- | ३ ऑक्टोबर | ४ ऑक्टोबर | ||
द्वितीय टप्पा- | ४ ऑक्टोबर | ४ ऑक्टोबर | ||
द्वितीय चाचणी- | १७ ऑक्टोबर | १८ ऑक्टोबर | ||
तृतीय टप्पा- | १८ ऑक्टोबर | १८ ऑक्टोबर | ||
तृतीय चाचणी- | ३१ ऑक्टोबर | १ नोव्हेंबर | ||
चतुर्थ टप्पा- | १ नोव्हेंबर | १ नोव्हेंबर | ||
चतुर्थ चाचणी- | १७ नोव्हेंबर | १८ नोव्हेंबर | ||
३. | प्रत्यक्ष परीक्षा घेणे- | १९ नोव्हेंबर | २८ नोव्हेंबर | या कालावधीत दोन खंडात असलेली प्रश्नपत्रिका सोडवून ती प्रस्तुत (सबमिट) करायची. |
४. | उत्तरपत्रिका मूल्यांकन- | १९ नोव्हेंबर | ३० नोव्हेंबर | उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन पूर्ण संगणकाद्वारे केले जाणार. |
५. | निकाल- | ३ डिसेंबर | ३ डिसेंबर | निकालप्रणाली पूर्ण संगणकाद्वारे होणार. |
६. | प्रशस्तीपत्रक + पारितोषिक वितरण- | ३ डिसेंबर | ६ डिसेंबर | संगणकाद्वारे प्रशस्तीपत्रक वितरण आणि आकर्षक पारितोषिकांचे वितरण. |
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)ची गुणांकन पद्धती
अनु. क्र. | प्रश्नाचा प्रकार | प्रश्नाचे स्वरूप | परीक्षा | प्रश्न संख्या | वेळ (मिनिटे) | प्रत्येकी गुण | एकूण गुण |
१ | बहुपर्यायी प्रश्न | ठराविक वेळेत दिलेले बहुपर्यायी प्रश्न सोडविणे. | खंड १ ७५ मिनिटे ४० गुण |
४० | ७५ | १ | ४० |
२ | चित्रावरून बहुपर्यायी प्रश्न | प्रत्येक चित्र दाखवले जाईल आणि त्यावर एकेक बहुपर्यायी प्रश्न विचारला जाईल. एकूण १० चित्रे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी दोन चित्रे असतील. | खंड २ ७५ मिनिटे ५० गुण |
१० | २५ | २ | २० |
३ | व्हिडियोवरून प्रश्न | तीन ते चार मिनिटांचा व्हिडियो दाखवला जाईल. प्रत्येक व्हिडियो नंतर दोन बहुपर्यायी प्रश्न दाखवले जातील. असे पाच व्हिडियो असतील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र प्राणीशास्त्र आणि खगोलविज्ञान या विषयांवर आधारित प्रत्येकी एक व्हिडियो असेल. | १० | ४० | २ | २० | |
४ | क्रम लावा | एखादा घटनाक्रम / प्रयोग / प्रक्रिया वेगवेगळ्या १० टप्प्यांमध्ये दिली असेल. त्याचा योग्य क्रम लावणे. | १ | १० | १० | १० | |
५ | अभ्यासक्रम चाचणीचे गुण | अभ्यास सामग्री बरोबर देण्यात आलेले क्विझ सोडवून मिळालेल्या गुणांपैकी २५ टक्के गुण | चाचणी १० गुण |
१० | |||
एकूण गुण | १०० |
वेध २०३५ ऑनलाईन विज्ञान परीक्षा (शालेय)विषयी नियमावली
- प्रथमा परीक्षा– लहान गटासाठी – इयत्ता ६वी-७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि
द्वितीया परीक्षा– मोठ्या गटासाठी – इयत्ता ८वी-९वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ते प्रथमा परीक्षा सुद्धा देऊ शकतात; त्यासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. - शाळेत शिकणाऱ्या (औपचारिक शिक्षण घेणाऱ्या) आणि आपल्या घरून शिक्षण घेणाऱ्या (होम स्कूलिंग) अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार आहे.
- प्रवेशासाठी शाळेकडील – चालू अथवा मागिल वर्षीच्या – इयत्तेचा दाखला अथवा ओळखपत्र (identity card) अनिवार्य आहे. होमस्कूलिंग व शाळेत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वयाचा दाखला अनिवार्य आहे उदा. बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड.
- परीक्षा दोन्ही माध्यमातून आहे – मराठी आणि इंग्रजी. विद्यार्थ्याने परीक्षेसाठी अर्ज भरताना आपल्याला पाहिजे ते माध्यम निवडावे. याच माध्यमातून विद्यार्थ्याला अभ्यास-सामग्री उपलब्ध करून दिली जाईल.
अभ्यास सामग्री विकसन मंडळ
श्री. हेमंत लागवणकर, श्री. आनंद घैसास, श्री. विक्रांत घाणेकर, डॉ. तनुजा परुळेकर, श्रीम. सुनित
धारणे, श्रीम. प्रिया लागवणकर, श्रीम. चारुशीला जुईकर, श्रीम. शुभदा वक्टे, श्रीम. अनघा वक्टे,
श्रीम. सुचेता भिडे, आणि डॉ. जयंत जोशी